• A
  • A
  • A
लग्नाच्या ८ दिवस अगोदरच तरुणीवर काळाचा घाला; केळवण करून परतताना अपघात

भंडारा - दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे. यामध्ये एका २२ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. या तरुणीचे आठ दिवसांनी लग्न होणार होते. त्यामुळे तिच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा -हिंदुस्तान कंपोझिट कंपनीच्या कामगारांचे मृतदेह घेवून आंदोलन
मंगळवारी भंडारा व मोहाडी येथे दोन वेगवेगळे अपघात झाले. या अपघातात तरुणीसह दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
लाखनी तालुक्यातील टेकेपार गावात राहणारी २२ वर्षीय मंजुषा एकनाथ ठवकर हिचे नुकतेच लग्न जमले होते. येत्या दहा फेब्रुवारीला साक्षगंध आणि १४ फेब्रुवारीला लग्न होणार होते, लग्न जुळले म्हणून तिच्या बालपणीच्या मैत्रिणीने तिला केळवणाचे जेवण करण्यासाठी रविवारी आमंत्रित केले. मंगळवारी मैत्रिणीचे पती हरिश्चंद्र इनवाते (वय ३२ रा. खराडी) हे स्वतःच्या दुचाकीवरून मंजुषाला तिच्या घरी सोडण्यासाठी जात होते.
दरम्यान, वैनगंगा नदीच्या पुलावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच ३४ ए ५९७१) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात इनवाते यांचा जागीच मृत्यू झाला तर मंजुषा गंभीर जखमी झाली असल्याने तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा -दीडशे वर्षाची परंपरा जपण्यासाठी आधुनिक 'शंकरपट'; पहिल्यांदाच बैलाऐवजी धावले ट्रॅक्टर
मंजुषा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला होती. तिचे लग्न बुलढाणा जिल्ह्यातील लोखंडा गावातील खासगी कंपनीत नोकरी करत असलेल्या तरुणाशी जुळले होते. मंजुषा चे वडील हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. अतिशय गरीब कुटुंबातील असूनही मंजुषाने पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून तिने पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी करत होती. मुलीच्या लग्नाची ठवकर कुटुंबाची संपूर्ण तयारी झाली होती. घरातील पहिला लग्न सोहळा असल्याने कुटुंब आनंदित होते. मात्र, नियतीला काही वेगळेच अपेक्षित असल्याने ज्या घरात लग्नाचा बँड वाजणार होता. त्याच घरात मंजुषाच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे.तर दुसर्‍या घटनेत तालुक्यातील हुतात्मा स्मारकासमोर पिक-अपने दुचाकीला धडक दिल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा -तालुक्याच्या मागणीसाठी अड्याळवासी आक्रमक; सर्वच निवडणुकांवर बहिष्काराचा ठराव
मुजबी येथील हितेश गणवीर (वय २६) व एकलारी येथील प्रणय गजभिये (वय २६) हे दोघेही दुचाकीने तुमसर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पेपर देण्यास गेले होते. पेपर झाल्यावर दोघेही दुचाकीने गावाकडे परत येत असताना मोहाडी येथील हुतात्मा स्मारकाजवळ महिंद्रा पिक-अपने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES