• A
  • A
  • A
हिंदुस्तान कंपोझिट कंपनीच्या कामगारांचे मृतदेह घेवून आंदोलन

भंडारा - लाखनी येथील राजेगाव औद्योगिक क्षेत्रात हिंदुस्तान कंपोझिट लिमिटेड कंपनीमध्ये लक्ष्मण चानोरे यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह घेऊन कामगारांनी आंदोलन सुरू केले. मृताच्या कुंटुंबीयांना आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला नोकरी मिळावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली होती. कंपनीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.


हेही वाचा-दीडशे वर्षाची परंपरा जपण्यासाठी आधुनिक 'शंकरपट'; पहिल्यांदाच बैलाऐवजी धावले ट्रॅक्टर
लक्ष्मण हे हिंदुस्तान कंपोझिट येथे २५ जानेवारी २०१९ ला कामावर असताना अचानक चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतर कंपनीत कार्यरत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी प्रथम भंडारा येथे रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले. मात्र, ८ दिवसांच्या उपचारानंतरही त्यांना वाचवता आले नाही. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मिळताच येथील कामगारांनी लक्ष्मण यांचा मृतदेह नागपूरवरून सरळ कंपनीत आणला आणि कंपनीविरोधात आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कंपनीमध्ये एकच धावपळ सुरू झाली.

लक्ष्मण हा कंपनीतील स्थाई कामगार असल्याने त्याच्या कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत मिळावी. तसेच पुढील उदरनिर्वाहासाठी त्याच्या पत्नीला कंत्राटी पद्धतीने काम मिळावे आणि १२ वर्ष असलेल्या त्यांच्या मुलाला १८ वर्षानंतर किंवा त्याच्या शिक्षणानुसार कायम स्वरूपी नोकरी द्यावी, अशा मागण्या कामगार नेत्यांमार्फत करण्यात आल्या आहेत. या आंदोलनानंतर कंपनीचे जनरल मॅनेजर यांनी याविषयी नंतर चर्चा करू, प्रथम मृतदेहावर अंतिम संस्कार करा, अशी विनंती केली. मात्र, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही, तोपर्यंत मृतदेह येथून हलवला जाणार नाही, अशी ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबीयांनी घेतल्याने जनरल मॅनेजर यांनी याविषयी कंपनीच्या मालकांशी फोनवरूनच चर्चा केली आणि कामगारांच्या ठाम भूमिकेविषयी माहिती दिली.
हेही वाचा-भंडाऱ्यात संस्कृत भारतीचे २ दिवसीय प्रांत संमेलन संपन्न
जवळपास ३ तासानंतर कंपनीने लक्ष्मण चानोरेंच्या कुटुंबाला ३० दिवसांच्या आत २ लाख रुपये देण्याचे आणि त्यांच्या पत्नीला कंत्राटी पद्धतीने कामावर घेण्याचे व सध्या लहान असलेल्या मुलाला १८ वर्षानंतर कायम स्वरूपी नोकरीवर घ्यायचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा-तालुक्याच्या मागणीसाठी अड्याळवासी आक्रमक; सर्वच निवडणुकांवर बहिष्काराचा ठराव


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES