• A
  • A
  • A
तालुक्याच्या मागणीसाठी अड्याळवासी आक्रमक; सर्वच निवडणुकांवर बहिष्काराचा ठराव

भंडारा - मागील २९ वर्षांपासून तालुक्याच्या निर्मितीची मागणी करणाऱया अड्याळवासीयांनी सरकारला १५ दिवसांची मुदत दिली आहे. १५ दिवसात तालुक्याची घोषणा न झाल्यास येणाऱ्या लोकसभेपासून सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.


भंडारा आणि पवनी तालुक्यांच्या मधोमध अड्याळ गाव आहे. हे गाव पवनी तालुक्यात येत असून गावाला तालुका व्हावा यासाठी मागील २९ वर्षांपासून गावकरी प्रयत्नशील आहेत. यासाठी बऱयाचवेळा आंदोलने आणि मोर्चे ही करण्यात आले. मात्र, प्रत्येक वेळी केवळ आश्‍वासने देऊन गावकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे गावकऱ्यांनी २६ जानेवारीच्या ग्रामसभेत एक ठराव घेतला. यात १५ फेब्रुवारीपर्यंत सरकारने अड्याळ गावाला तालुका घोषित करावा. अन्यथा यानंतर होणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा ईशारा गावकऱयांनी दिला आहे. या ठरावाची प्रत जिल्हाधिकार्‍यांना देऊन आमच्या मागण्यांविषयी गांभीर्याने विचार करावा, अशी विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यासाठी लागणारे सर्व निकष अड्याळ पूर्ण करत असल्याचा दावा

तालुक्याच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व निकष अड्याळ गाव पूर्ण करीत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. गावाची लोकसंख्या ही २० हजार आहे. अड्याळ परिसरात १०२ गावं आणि ६४ ग्रामपंचायती आहेत. परिसरातील एकूण लोकसंख्या १ लाख १७ हजार एवढी आहे. तर एकूण क्षेत्रफळ ६८ चौरस मीटर एवढे आहे. अड्याळमध्ये सर्व प्रशासकीय कार्यालये, शाळा, ग्रामीण रुग्णालय आहेत. गावाच्या मधून ४ पदरी राष्ट्रीय महामार्गाचीही निर्मिती होत आहे. तालुका नसल्याने शासकीय कामांसाठी लोकांना ३० किमीवर असलेल्या अवनी शहरात जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

राजकीय इच्छाशक्ती अभावी अड्याळवर अन्याय

लाखनी व अड्याळ तालुका निर्मितीचा प्रस्ताव एकाच वेळी सादर झाला होता. मात्र, राजकीय इच्छाशक्ती अभावी अड्याळवर अन्याय करण्यात आला. अड्याळ तालुका घोषित व्हावा यासाठी अड्याळ कृती संघर्ष समितीची स्थापना केली आहे. १५ फेब्रुवारी पर्यंत जर अड्याळ तालुका घोषित झाला नाही, तर १६ तारखेपासून जिल्‍ह्यातील सर्व राजकीय पक्षांना मतदानाच्या बहिष्काराचे पत्र पाठवणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच निवडणुकीवर बहिष्कार हे आमचे पहिले अस्त्र असून त्यानंतर धरणे, ठिय्या आंदोलन, उपोषण, गाव बंद असे वेगवेगळे आंदोलन करून आमची रास्त मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES