• A
  • A
  • A
'६ हजार नको, स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव, सिंचनाची व्यवस्था द्या'

भंडारा - अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६ हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावर आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली असता त्यांना ६ हजार नको, स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव, सिंचनाची सोय हवी, अशा मागण्या येथील शेतकऱ्यांनी केल्या आहेत.


केंद्र शासनाने दोन हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वार्षिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत. मात्र, शेतकऱ्यांना पैसा नको तर शेतीसाठी आवश्यक सुविधा आणि पिकाला आधारभूत किंमत हवी आहे. काही शेतकऱ्यांच्या मते ६ हजार म्हणजे येत्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना दिलेले एक प्रलोभन आहे.
हेही वाचा - धारगाव उपसा सिंचनासाठी २२ गावातील शेतकऱ्यांचा चक्का जाम, वाहतूक ठप्प
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २४ तास विजेची सुविधा हवी आहे. पेंच प्रकल्प, गोसे प्रकल्प, बावनथडी प्रकल्पातून त्यांना शेतीसाठी हक्काचे पाणी हवे आहे. खताचे वाढलेले दर कमी करावेत, सरसकट कर्जमाफी द्यावी, केवळ हे सहा हजार रुपये देऊन शासन काय साध्य करत आहे, हे कळत नाही. ही अत्यल्प मदत आहे, मदतीची रक्कम जास्त मिळायला हवी होती. खताचे आणि मजुरीचे वाढलेले दर लक्षात घेता ही तुटपुंजी मदत आहे. आम्हाला शेतीशी निगडीत सगळ्या गोष्टींनुसार योग्य सोयी सुविधा केल्यास या पैशांची गरज पडणार नाही. हे ६ हजार शासनाने पंतप्रधान मोदी यांच्या खात्यात जमा करावेत. शेतकऱ्यांना ६ हजार देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, असे मत त्यांनी मांडले. एकंदरीतच केंद्र शासनाची ६ हजारांची मदत भंडारा जिल्ह्यातील शेतकरी नाकारत आहेत.

हेही वाचा- 'अण्णा हजारे हे खोटारडे आणि नथुराम गोडसेपेक्षाही घातक'
सत्तेत येण्यासाठी मोदींनी त्यांच्या भाषणात आश्वासन दिले होते की, सत्तेत आल्यावर आम्ही तुमच्या मालाला दुप्पट दर देऊ, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू. मात्र, मागील साडेचार वर्षांचा विचार केला तर या पैकी एकही गोष्ट भाजप सरकारला करता आली नाही. यामुळे निवडणुकीला लक्षात ठेवून शेतकऱ्यांना प्रलोभन देण्यासाठी ही खेळी खेळली असल्याचे मत शेतकऱ्यांनी माडले आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES