• A
  • A
  • A
धारगाव उपसा सिंचनासाठी २२ गावातील शेतकऱ्यांचा चक्का जाम, वाहतूक ठप्प

भंडारा - जिल्ह्यातील धारगाव परिसरातील २२ गावातील शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी गोसे धरणाच्या बॅक वॉटरवर धारगाव उपसा सिंचन उभारण्याची मागणी करण्यात आली.


धारगाव परिसरातील ३२०० हेक्टर जमिनीला सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी ४ वर्षापूर्वी माजी आमदार नरेंद्र भोंडकर यांनी तत्कालीन पालक मंत्री दीपक सावंत याना गोसे धरणाच्या बॅक वॉटरवर धारगाव उपसा सिंचन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. मात्र, शासनाच्या दिरंगाईमुळे धारगाव उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव धूळखात पडला आहे. अनेकदा याविषयी पाठपुरवठा करूनही कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे सिंचनाअभावी नुकसान होत आहे.
हेही वाचा - मराठा समाजाला स्वातंत्र्यानंतर ओबीसीमधून वगळले, मागास आयोगाचा निष्कर्ष
माजी आमदार आणि उपसाचा सिंचन संघर्ष समितीच्या नेतृत्वात झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. त्यामुळे एक तास वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागायला सुरुवात झाली. त्यामुळे प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी पोहोचून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. तसेच त्यांच्या प्रस्तावाविषयी वरिष्ठ स्तरावर लवकरच चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा -पुनर्वसन करण्यापूर्वी योग्य पर्यायी व्यवस्था करा, आदिवासींची मागणी
गोसे धरणाच्या बॅक वॉटरला योग्य नियोजन करून धारगाव उपसा सिंचन योजना सुरू केल्यास या क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल. त्यामुळे हा प्रस्ताव शासनाला दिला होता. मात्र, शासन गंभीर नसल्याने आज हे चक्का जाम आंदोलन केले. उपसा सिंचनाविषयी सकारात्मक भूमिका घेऊ, असे आश्वासन मिळाल्यामुळे आंदोलन मागे घेतले. मात्र, हे आश्वासन केवळ भूल थापा निघाल्यातर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार नरेंद्र भोंडकर यांनी दिला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES