• A
  • A
  • A
भंडाऱ्यात तापमानात घट, पारा ६ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरला

भंडारा - मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. अवकाळी पावसानंतर तापमानात घसरण होऊन आता जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ६ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. अचानक वाढलेल्या या बोचऱ्या थंडीमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. रात्री ९ नंतर रस्ते निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत.


हेही वाचा -'अण्णा हजारे हे खोटारडे आणि नथुराम गोडसेपेक्षाही घातक'
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडी वाढली होती. मात्र, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर थंडीचा प्रभाव कमी झाला. परंतु, २४ जानेवारीला झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली आहे. मंगळवारी तर पारा ६ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आला.

हेही वाचा - अपघातानंतर भंडाऱ्यात रास्ता रोको, आर्थिक मदतीशिवाय मृतदेह स्वीकारण्यास नकार
वाढत्या थंडीमुळे सध्या शहरात बऱ्याच ठिकाणी शेकोट्या पेटवलेल्या दिसत आहेत. संपूर्ण विदर्भात सध्या थंडीची लहर सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून काही दिवस पारा असाच कमी राहणार असून, लोकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES