• A
  • A
  • A
अपघातानंतर भंडाऱ्यात रास्ता रोको, आर्थिक मदतीशिवाय मृतदेह स्वीकारण्यास नकार

भंडारा - जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सोमवारी ३ वाजताच्या टिप्पर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर मालक आणि प्रशासन आर्थिक मदत देणार नाही, तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी भूमिका घेत लोकांनी रास्ता रोको केला.वायगावचे श्यामसुंदर बाळाजी रायपूरकर (५०) आणि परसराम कवडू दोहतरे (६५) हे कौटुंबीक लग्न सोहळा आटपून टीव्हीएस मोपेडने पवनीवरुन वायगावकडे निघाले होते. बेटाळा गावाजवळच्या पेट्रोलपंप जवळ नागपूरवरुन पवनीच्या दिशेने राँग साईड येणाऱ्या टिप्परने (क्रमांक एमएच -३६-एफ ४३५७ ) ने दुचाकीला जबर धडक दिली. टिप्परच्या उजव्या चाकाच्या खाली आल्याने शामसुंदर रायपूरकर आणि परसराम दोहतरे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती परिसरात पसरताच नागरिक घटनास्थळी जमा झाले. नागरिकांनी घटनास्थळी दोन्ही बाजूला टायर पेटवून रस्ता जाम करत टिप्परच्या काचा फोडल्या. टिप्पर मालक किशोर पंचभाई घटनास्थळी येऊन आर्थिक मदत देणार नाहीत, तोपर्यंत मृतदेहाला हात लावून देणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेत ३ तासांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

नागरिकांचा संताप पाहून पोलिसांनी अधिकची कुमक बोलावून बंदोबस्त वाढविला आहे. पोलीस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर घटनास्थळी पोहोचून नागरिकांशी आणि टिप्पर मालकाशी संवाद साधून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न करीत आहे.
वाळूमाफियांची दहशत -

सध्या भंडाऱ्यात रेती घाट बंद असले तरी दररोज १०० ते २०० टिप्पर रात्रीच्या वेळेस वाळू वाहतूक करतात. वाळूमाफियांना पोलिसांचे आणि महसूल विभागाचे अभय असल्याचा आरोप होतो. किशोर पंचभाई हा पवनी क्षेत्रातला मोठा वाळूमाफिया आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक त्याच्यावर चिडलेले आहेत. म्हणूनच किशोर पंचभाई घटनास्थळावर यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. रास्तारोको अजून सुरुच असून नागरिकांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES