• A
  • A
  • A
प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन

अमरावती - विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या जन आक्रोश महामोर्चादरम्यान प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिया देऊन चक्काजाम आंदोलन पुकारले.


या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक ठप्प झाली. कार्यालयासमोरील तिन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.अमरावती विभागातील हजारो प्रकल्पग्रस्तांचा महामोर्चा विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांच्या नेर्तृत्वात नेहरू मैदान येथून निघाला.

प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या

  • डिसेंबर २०१३ पर्यंत अल्पदरात जमिनी खरेदी केलेल्या खरेदीदार शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यातील तरतुदीनुसार मोबदला देण्यात यावा.
  • प्रकल्पग्रस्त विस्थापितांचे पुनर्वसन २०१३ च्या कायद्यानुसार करण्यात यावे.
  • प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची कायदेशीर तरतूद करावी आणि ती ५ टक्क्यावरुन १५ टक्के करण्यात यावी.
यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर निघाला होता. दरम्यान, आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिन्ही बाजूंच्या रस्त्यांवर आपली वाहने उभी करून रस्ता अडविला होता. तर आंदोलकांनी सोबत आणलेली शिदोरी सोडून जिल्हाधिकारी कार्यलयासमोरील बसून जेवण केले. प्रकल्पग्रस्तांच्या रास्तारोको आंदोलनामुळे जिल्हा सत्र न्यायालय, विद्यापीठ, गर्ल्स हायस्कुलकडून येणारी वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. दरम्यान, आमच्या मागण्या पूर्ण मान्यहोईपर्यंत जिल्हाधिकारी कार्यल्यासमोरून आम्ही उठणार नाही, असा इशारा या आंदोलकांनी दिला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES