अमरावती - जिल्ह्यातील शेलू नटवा या गावात सुरू असलेले अवैद्य दारू धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या ठिकाणी मोर्चेकर ग्रामस्थांनी निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांची भेट घेऊन दारूबंदी करण्याची मागणी केली.
हेही वाचा - अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आज दोन मोर्चे गेल्या काही काळापासून शेलू नटवा गावात अवैद्य दारूधंदे वाढले आहेत. गावामध्ये तब्बल १० ते १२ दारूचे धंदे आहे. या दारूधंद्यामुळे गावातील तरुणाई व्यवसनाच्या आहारी जात आहे. तसेच दारूमुळे गावात गावात अनेकवेळा जातीय तंटेही निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील दारू धंदे बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकवेळा केली होती. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळए दारूधंद्याला प्रशासनाचे अभय असल्याचा आरोपदेखील ग्रामस्थांनी केला आहे. हेही वाचा - अमरावती म्हणजे अवैध गुटखा विक्रीचे केंद्र - आमदार देशमुख
गावात दारूबंदी झालीच पाहिजे, असा निर्धार करून अखेर ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेलू नटवाच्या सरपंच मयुरी चौधरी, उपसरपंच हिम्मत राऊत, अभिजित ढेपे, युवासेना प्रमुख प्रकाश मारोडकर मोर्चात सहभागी होते.