• A
  • A
  • A
शैलेश नवल अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी

अमरावती - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून सोमवारी रुजू होणार आहेत.


हेही वाचा - अनाथ मूकबधिर वैशाली, अनिलच्या आयुष्यात उजाडला सोनेरी दिवस
अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणून ओमप्रकाश देशमुख यांनी अवघे २ महिन्यापूर्वी म्हणजे १ डिसेंबरला पदभार स्वीकारला होता. आता शैलेश नवाल सोमवारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडून सूत्रे स्वीकारणार आहेत. शैलेश नवाल हे २०१० च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. आदिवासी विकास प्रकल्प संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. यावर्षी राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने नवाल यांना गौरवण्यात आले आहे.
हेही वाचा - आरक्षणासाठी अमरावतीत धनगर समाजाचे आक्रोश आंदोलनCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES