• A
  • A
  • A
अनाथ मूकबधिर वैशाली, अनिलच्या आयुष्यात उजाडला सोनेरी दिवस

अमरावती - चेंबुरच्या रेल्वेस्थानकावर फेकलेले नवजात बाळ वझ्झरच्या आश्रमात लहानाचे मोठे झाले. अनाथांचे नाथ असणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांनी त्या बाळाचे वैशाली नाव ठेवून संगोपन केले. वैशालीसारखाच अनिल हासुद्धा कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरून शंकर बाबांनी उचलून आणला. हे दोघेही जन्मतःच मूकबधीर. शंकरबाबा पापळकरांनी वाढविलेले हे दोघेही आज विवाहबद्ध झाले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर अगदी शाही थाटात आयोजित विवाह सोहळ्यात नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यास राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांनी गर्दी केली.


वधू वैशालीचे वडील म्हणून खासदार आनंदराव अडसूळ आणि आईच्या नात्याने मंगला अडसूळ यांनी लग्नाची सर्व जबाबदारी सांभाळली. तर वर अनिलचे वडील म्हणून पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आणि आईच्या नात्याने रंजना बाविस्कर यांनी सर्व सोपस्कार पूर्ण केले. सायंकाळी ५ वाजता राजकमल चौक येथील टाऊन हॉल येथून वाजत गाजत नवरदेवाची घोड्यावरून वरात निघाली. वरात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रवेशद्वारावर येताच अडसूळ कुटुंबीयांनी पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले. मुलीचे मामा या नात्याने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे यांनी नवरदेवाचे पाय धुतले तर नवरीचे पाय निखिल गाले यांनी धुतले. भटजींनी विधीपूर्वक मंगलाष्टके म्हटल्यावर फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू असताना वैशाली आणि अनिलने एकमेकांच्या गळ्यात हार घालत आयुष्यभरासाठीचे जोडीदार झाले.
हेही वाचा -आरक्षणासाठी अमरावतीत धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन
शंकरबाबा पावळकर यांनी वाढविलेल्या अनाथांपैकी आज विवाहबद्ध होणारे वैशाली आणि अनिल हे विसावे जोडपे आहे. या खास विवाह सोहळ्याला राष्ट्रीय महोत्सव म्हणून संबोधण्यात आले. हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन आशा सर्व धर्मांचे गुरू या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते.
हेही वाचा -अमरावती शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
या लग्न सोहळ्यात मुलाची मावशी म्हणून आमदार यशोमती ठाकूर, मुलीचे मामा म्हणून सुनील भालेराव यांनी जबाबदारी पूर्ण केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार डॉ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, दर्यापुरचे आमदार रमेश बुंदीले, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी, माजी महापौर विलास इंगोले, महापालिकेचे विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मनीषा टेंबरे, वर्षा भोयर, यांच्यासह पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी या सोहळ्याला उपस्थित होते.
शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थेचे प्रमुख शिवशंकर पाटील यांनी या सोहळ्यात उपस्थित राहून संत गजानन महाराज मंदिर येथील बुंदीच्या लाडूंचा प्रसाद लग्नात येणाऱ्या सर्व पाहुण्यांना वितरित केला. नवदाम्पत्यास येणाऱ्या भेटवस्तूंचे दालन दुचाकी, टीव्ही, सोफा, कुलर आदी अनेक वस्तूंनी भरून गेले होते. या लग्नसोहळ्यानिमित्त श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा परिसर बहरून गेला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES