• A
  • A
  • A
आरक्षणासाठी अमरावतीत धनगर समाजाचे आक्रोश आंदोलन

अमरावती - 'अगोदर आरक्षण, मग सरकार' अशी घोषणा देत आज जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांनी अमरावतीत आक्रोश आंदोलन छेडले आहे. या आंदोलनानिमित्त जिल्हाभरातील शेकडो धनगर बांधवांनी इर्विन चौक येथे ठिय्या दिला आहे.


हेही वाचा -अमरावती म्हणजे अवैध गुटखा विक्रीचे केंद्र - आमदार देशमुख
धनगर आरक्षण समितीच्या वतीने आयोजित या आक्रोश आंदोलनात खासदार विकास महात्मे, धनगर नेते संतोष महात्मे प्रामुख्याने सहभागी झाले आहेत. इर्विन चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला खासदार विकास महात्मे यांनी हार अर्पण केला. त्यानंतर आंदोलनस्थळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर आंदोलनाला सुरुवात झाली.
यावेळी धनगर समाजातील तरुण, वृद्ध, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आता धनगर समाजाला आधी आरक्षण मिळेल त्यानंतरच निवडणूक आणि नवीन सरकार येईल, असा निर्धार करण्यात आला. खासदार विकास महात्मे यांनी केंद्र सरकार धनगरांना आरक्षण देण्याच्या तयारीत असून येत्या २५ दिवसांत धनगरांना आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. आजचे आंदोलन हे सर्वसामान्य समाज बांधवांनी आयोजित केले आहे. समाजाच्या भावनेची दखल सरकारला घ्यावी लागेल असेही खासदार महात्मे म्हणाले.
हेही वाचा -विविध मागण्यांसाठी अमरावती विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा
आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, नगरसेवक दिनेश बूब यांनी भेट दिली. या आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इर्विन चौक येथे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES