• A
  • A
  • A
अमरावती म्हणजे अवैध गुटखा विक्रीचे केंद्र - आमदार देशमुख

अमरावती - महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे. मात्र, अमरावती शहर हे गुटख्याची अवैध निर्मिती आणि विक्रीचे प्रमुख केंद्र बनले असल्याची धक्कादायक माहिती आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी दिली आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.


अमरावती आणि अकोला जिल्ह्यात अचानक कर्करुग्णांची संख्या वाढली असल्याचे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. घशाचा आणि अन्ननलिकेचा कर्करोग असलेल्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामागे अवैध गुटखा आणि ओला खर्रा याची व्यसनाधीनता हेच मुख्य कारण आहे. एक संपूर्ण पिढी या व्यसनामुळे बरबाद होत आहे. यामुळे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम राबवावी, असे निर्देश आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी दिले.
हेही वाचा - हिंगणघाटच्या १४ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

गुटखाबंदीच्या नावाखाली केवळ गोदामाच्या रखवालदारावर कारवाई केली जाते. मात्र, मोठे मासे हाती का लागत नाहीत? असा सवाल आमदार डॉ. देशमुख यांनी अन्न व औषधी विभागांच्या अधिकाऱ्यांना केला. यावर संबंधित अधिकारी उत्तर देण्यास असमर्थ ठरले. देशमुख यांनी शहरातील सर्व गुटखा विक्री बंद करण्यासाठी मोहीम राबविण्यास सांगितले. शहरात तीन ते चार गुटखा निर्मितीचे सर्व कारखाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी अन्न व औषध विभागाने गांभीर्याने कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

बैठकीला जिल्हादधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मिना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम, निवासी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, अन्न व औषध विभागाचे अधिकारी एस.डी. केदारे, बी.के. चव्हाण आदी उपस्थित होते

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES