• A
  • A
  • A
विविध मागण्यांसाठी अमरावती विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा

अमरावती - विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठात मोर्चा काढला. यावेळी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर पोलीस बंदोबस्त लावून इमारतीच्या फाटकाला विद्यापीठ प्रशासनाने कुलूप लावल्याने प्रचंड गोंधळ झाला. यावेळी फाटक उघडल्यावर मोर्चाने चक्क सायकल सोबत आणून कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या समोर ठेवली.यावेळी विद्यार्थी आणि कुलगुरुंमध्ये शाब्दीक चकमक झाली.


हेही वाचा - आर्थिक व्यवहारातून मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची नियुक्ती ;...
उत्तरपत्रिका मूल्यांकनातील घोळ, 100 दिवस उलटूनही अभियांत्रिकी, फार्मसी, विधी परीक्षेचा निकाल जाहीर न होणे, विद्यापीठातील पार्किंग शुल्क बंद होणे, अशा विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोर्चा विद्यापीठात धडकला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ सहमंत्री ज्ञानेश्वर खुपसे यांच्या नेतृत्वात शेकडो विद्यार्थी विद्यापीठात धडकले. मूल्यांकनात अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण पुर्नमूल्यांकनात दुपटीने तर कधी तिपटीने वाढतात. हा प्रकार नेमका काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला. तसेच कायद्याने २ उत्तरपत्रिकांच्यावर पुर्नमूल्यांकन करता येत नाही. मात्र, ५० विद्यार्थ्यांचे दोनपेक्षा जास्त उत्तरपत्रिकांचे पुर्नमूल्यांकन केले, अशी माहिती विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिली. तेव्हा कुलगुरूंनी या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले.

हेही वाचा - यवतमाळमधील एकाच महाविद्यालयातील एमबीएचे ९० टक्के विद्यार्थी...
सगळे निकाल १५ दिवसात लागतील. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठ १०० टक्के तत्पर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी कुलगुरूंच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत कुलगुरूंना आणि परीक्षा नियंत्रकांना काम झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी केल्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला.

मूल्यांकनात अनुत्तीर्ण करून पुर्नमूल्यांकनात उत्तीर्ण होणे हा प्रकार म्हणजे पैसे कमविण्याचा उद्योग असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. पुर्नमूल्यांकनात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी केली. तेव्हा हे शक्य नाही असे स्पष्टीकरण कुलगुरूंनी दिले. विद्यापीठातील वाहन पार्किंगसाठी शुल्क नाकारणे बंद करावे, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. यावर कुलगुरूंनी सर्व महाविद्यालयात पार्किंग शुल्क आकारण्यात येतात. विद्यार्थ्यांची पार्किंग शुल्क योग्यच आहे.

हेही वाचा - मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांच्या भूमिकेने पेपर तपासणीचे काम...
प्रश्नपत्रिकेत चुका होत्या आणि परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका उशिरा आल्या, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली. तेव्हा कुलगुरूंनी प्रश्नपत्रिकेत चूका असतील तर पेपर झाल्यानंतर ४ दिवसात याची तक्रार करण्याचा नियम आहे, तशी तक्रार का केली नाही? असा प्रतिप्रश्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात जिमखाना नाही तरी देखील बंद जिमखान्याचे पैसेही कसे घेतले जातात याबाबत स्पष्टीकरण मागितले. तेव्हा कुलगुरूंनी जिमचे शुल्क हे शासनाच्या नियमानुसारच घेतले जाते. तसेच लवकरच विद्यार्थ्यांसाठी जुनी जिम सुरू करण्यात येईल, अशी माहिती दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES