• A
  • A
  • A
अमरावतीत मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांची फटकेबाजी

अमरावती- सत्तेत येण्यापूर्वी आणि सत्तेत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यात, वागण्यात बराच फरक देशाने अनुभवला आहे. बोलायची भाषा एक आणि कृती भिन्न असणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक एकत्र येत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत ते अमरावतीत बोलत होते.


हेही वाचा- ऐतिहासिक संधी मिळूनही मोदींनी विकासाचा इंद्रधनुष्य पेलला नाही - जयंत पाटील
१० जानेवारीला रायगड येथून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा आज अमरावतीत पोहचली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजीत पवार, छगन भुजबळ, अरुण गुजराती आदी नेते परिवर्तन यात्रेनिमित्त अमरावतीत आले होते. नेहरू मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी जनतेला संबोधित केले.

हेही वाचा- अमरावतीत तीन खासगी बसेस अज्ञाताने जाळल्या, पूर्ववैमनस्यातून पेटवल्याचा संशय
सत्तेत येण्याआधी आणि सत्तेत आल्यावर सत्ताधाऱ्यांच्या वाणीत, रुपात पूर्णतः बदल झालेला दिसतो आहे. २ कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार मिळवून देऊ, असे सत्तेत येण्यापूर्वी यांची भाषा होती. आज एका वर्षात नोकरीवर असणाऱ्या १ कोटी २० लक्ष जणांना बेरोजगार करण्यात आले. अमरावती शहराने कधीही पाणी टंचाई पहिली नाही मात्र, आज दिवसाआड पाणी मिळते आहे. शेतकरी त्रस्त आहेत, शेतमजूर गारद झाला आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर पडला आहे. खोटारड्यांची सत्ता उलथविण्यासाठी शरद पवार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विविध पक्ष एकत्रित येत आहेत. अमरावतीकरांनीही आता परिवर्तनाचा निर्धार करावा, असे पवार म्हणाले.
हेही वाचा- रशियन कलावंतांच्या ओडिसी नृत्याने अमरावतीकर मंत्रमुग्ध
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांची टिंगल उडवीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. दिल्लीत जे सुसज्ज महाराष्ट्र सदन उभारण्यात आले ते कसे असावे, यासाठी मी बांधकाम मंत्री म्हणून मीच सर्व निर्णय घेतले. १०० कोटीच्या या महाराष्ट सदन निर्माणात मी ६०० कोटींचा घोटाळा केला. कंत्राटदाराकडून पैसे हडपले, असा आरोप करून अडीच वर्षे मला कारागृहात ठेवले. वास्तवात दिल्लीतील महाराष्ट्र भावनांचा एक रुपयाही सत्तेत आलेल्या भाजपवाल्यांनी कंत्राटदाराला दिले नाहीत. आता कंत्राटदारालाच एक रुपया मिळाला नाही मग तो मला ६०० कोटी रुपये कसा देणार? हे मोठे कोडेच आहे. मोदी सरकार हे सर्व क्षेत्रात फेल झालेले सरकार आहे. यांच्यावर विश्वास न ठेवलेला बरा. सर्व क्षेत्रात अपयशी ठरल्याने हे आता हिंदू - मुस्लिम दंगली घडवून आणण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप करत सगळयांनी सावध राहण्याचा असा इशाराही त्यांनी दिला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES