• A
  • A
  • A
ऐतिहासिक संधी मिळूनही मोदींनी विकासाचा इंद्रधनुष्य पेलला नाही - जयंत पाटील

अमरावती - मोदींना २०१४ मध्ये सत्तेत येण्याची ऐतिहासिक संधी मिळाली असली तरी विकासाचा इंद्रधनुष्य पेलण्यास नरेंद्र मोदी अपयशी ठरलेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ते अमरावतीतील नेहरू मैदान येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.


हेही वाचा-अमरावतीत तीन खासगी बसेस अज्ञाताने जाळल्या, पूर्ववैमनस्यातून पेटवल्याचा संशय
१० जानेवारीपासून निघालेली राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा आज अमरावतीत दाखल झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, अरुण गुजराती हे सुद्धा अमरावतीत आले होते. सभेला संबोधीत करताना जयंत पाटील म्हणाले, केंद्रातील मोदी सरकार पुर्णतः अपयशी ठरले. पंतप्रधान होताच संसदेच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होणाऱ्या मोदींना पाहुन ते खरे लोकशाही जोपासणारे आहेत, असे सर्वांना वाटले. मात्र, वास्तवात ते वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांची गळचेपी करणारे, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत.
फ्रान्सने राफेल हे लढाऊ विमान कुवैतसह अनेक राज्यांना केवळ ५०० कोटीत विकले. मोदींनी फ्रान्सला जाऊन त्यांच्या पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत एक उद्योगपतीही होते. मोदींनी त्या उद्योगपतींच्या कंपनीच्या माध्यमातून भारतासाठी ३४ विमाने ही १ हजार ६७० कोटीला खरेदी केली. जनतेला मूर्ख बनविण्यात येत असून आता परिवर्तनाची गरज असल्याचे जयंत पाटील म्हणाले. यावेळी जयंत पाटील यांनी सत्तेत येण्यापूर्वीची मोदींची वक्तव्य आणि आताचे वास्तविक कृत्य यांच्या ध्वनीफितही सभेत सादर केली.
हेही वाचा-रशियन कलावंतांच्या ओडिसी नृत्याने अमरावतीकर मंत्रमुग्धCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES