• A
  • A
  • A
अमरावतीत तीन खासगी बसेस अज्ञाताने जाळल्या, पूर्ववैमनस्यातून पेटवल्याचा संशय

अमरावती - विभागीय आयुक्तालयालगत गणेडीवाल लेऊट येथे खुल्या मैदानावर उभ्या असलेल्या ३ खासगी बसेसला मंगळवारी रात्री संशयास्पदरित्या आग लागली. या आगीत तिन्ही बसेस जळून खाक झाल्या. या घटनेमुळे गणेडीवाल लेऊट परिसरात चांगलीच खळबळ उडाली.


हेही वाचा - एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक; थरार सीसीटीव्हीत कैद
कावेरी ट्रॅव्हल्स कंपनीच्या या तिन्ही बसेस मागील अनेक दिवसांपासून विभागीय आयुक्तालयालगतच्या खुल्या जागेवर उभ्या आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तिन्ही गाड्यांनी पेट घेतल्याचे परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आले. स्थानिक युवकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यानंतर अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. रात्री साडेबाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES