• A
  • A
  • A
रशियन कलावंतांच्या ओडिसी नृत्याने अमरावतीकर मंत्रमुग्ध

अमरावती- संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये रशियन कलावंतांच्या ओडिसी नृत्याने अमरावतीकर मंत्रमुग्ध झाले. कृष्णलिलेवर सोफिया या नृत्यांगणेने सादर केलेले ओडिसी नृत्य आणि कसेनिया व पोलिनी या रशियन मायलेकींनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांना खिळवून ठेवले.


संत गाडगेबाबा अमरावती विद्यपीठ, सांस्कृतीक भुवनेश्वर आणि कालाशिखर फौंडेशन यांच्या वतीने इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिवलचे विद्यापीठाच्या डॉ. के.जी. देशमुख सभागृहात आयोजन करण्यात आले होते. २ दिवसीय या महोत्सवाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी कालाशिखर फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भैय्यासाहेब मेटकर, हेमंत नृत्य कला मंदिर अमरावतीचे सचिव डॉ. मोहन बोडे, रशियातील शास्त्रीय नृत्यात पारंगत असणाऱ्या वाईटालीना लोबार्ट, उत्कल नृत्य निकेतनच्या संचालक शीतल मेटकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

वाचा -बुर्किना फासोत जिहादी हल्ल्यात १४ ठार; १४६ दहशतवाद्यांना कंठस्नान
विद्यापीठात इंटरनॅशनल डान्स फेस्टिवल सादर होणे हे आमचे भाग्य आहे. विद्यापठातील कामे अतिशय कठीण आणि कंटाळवाणे असताना असा कार्यक्रम आमच्यासाठी आनंदाची पर्वणी असल्याचे कुलगुरू डॉ. चांदेकर म्हणाले. उद्घाटन सोहळा आटोपतच विविध शास्त्रीय नृत्यांच्या सादरीकरणाने सभागृह बहरून गेले. आमदार यशोमती ठाकूर यांनी या सोहळ्याला भेट देऊन रशियन नृत्यांगणाचे कौतुक केले. सोफिया ही रशियन नृत्यांगणा ५ वर्षांपासून भारतात ओडिसी नृत्याचे धडे घेत आहे. ओडिसी नृत्यासह हिंदी भाषाही थोड्याफार प्रमाणात आत्मसात केली असल्याचे सोफिया म्हणाली. कृष्णलिलेवर आधारित सुंदर असे नृत्य सोफियाने सादर केले. खास ओडिसी नृत्य सादर करण्यासाठी मॉस्को येथून आलेल्या कसेनिया आणि त्यांची चिमुकली पोलिना यांनी सादर केलेल्या नृत्यविष्काराने उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या.
वाचा - दुष्काळी भागातील मदतनिधीसाठी १४५० कोटींचा पहिला हप्ता वितरित
या डान्स फेस्टिवलमध्ये मुंबई, पुणे, सोलापूर, हैद्राबाद, दिल्ली अशा विविध शहरातून कथक, भरतनाट्यम, ओडिसी, मणिपुरी असे विविध शास्त्रीय आणि पारंपरिक नृत्यांची मेजवानी अमरावतीकरांना उपलब्ध करून दिली आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES