• A
  • A
  • A
अमरावतीत परीक्षा सुरू होताच परीक्षाकेंद्र संचालकांची नियुक्ती रद्द

अमरावती - आजपासून शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा सुरू झाली. फारशी स्टॉप येथील संत कावरराम विद्यालय या परीक्षा केंद्रावर सकाळी ९ वाजता परीक्षा सुरू झाल्या. यानंतर तासाभरात परीक्षा केंद्र संचालक सुनीता सिसोदे यांची नियुक्ती रद्द ठरवून दुसऱ्या व्यक्तीला केंद्र संचालक पदाची जबाबदारी देण्याचा अफलातून प्रकार आज शिक्षणाधिकऱ्यानी केला. यामुळे परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली.


हेही वाचा - रेवसा येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी संत कावरराम विद्यालयात परीक्षा प्रमुख म्हणून सुनीता सिसोदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र त्यांना १ फेब्रुवारीला शिक्षणाधिकारी टाके यांनी दिले. सिसोदे यांनी शनिवारी आणि रविवारी परीक्षा घेण्यासाठीची सर्व तयारी केली. सर्व वर्ग खोल्यांमध्ये परीक्षार्थींचे परीक्षा क्रमांक बाकांवर टाकले. आज सकाळी ९ वाजता परीक्षा सुरू झाल्यावर त्यांना तुमची परीक्षा संचालक ही नियुक्ती रद्द केल्याचे सांगण्यात आले. या विचित्र प्रकारामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या अफलातून निर्णयाची शिक्षण क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली.
हेही वाचा - लोकसभेची निवडणूक रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर लढणार - राजेंद्र गवई




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES