• A
  • A
  • A
रेवसा येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

अमरावती - रेवसा येथील श्री गुरू गजानन धाम येथे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याद्वारे साकारण्यात आलेल्या मंदिरात आज संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंढरपूर येथील गाथामूर्ती रामचंद्रबाबा बोथे यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मंदिर आणि परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.


हेही वाचा-मेळघाटातील असुविधांमुळे पर्यटक नाराज, वनविभागाकडून फसवणूक होत असल्याचा आरोप
गत वर्षी २१ जानेवारीला रेवसा गावापासून काही अंतरावर श्री गजानन विजयग्रंथ महापारायण सोहळा आयोजित केला होता. त्याच स्थळावर आज संत गजानन महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिरावर कळस चढविल्यावर पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते आरती आणि पूजेचा विधी पार पडला. या सोहळ्याला अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत प्रामुख्याने उपस्थित होते. शेकडो भाविक या सोहळ्याचे साक्षीदार ठरले.
हेही वाचा-वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे, विवाहसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना रोपट्यांची भेट

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES