• A
  • A
  • A
शिक्षकांच्या प्रसंगावधानाने ४० विद्यार्थ्यांचे वाचले प्राण..

अकोला - हिवरखेड येथील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर मधील इयत्ता पहिलीच्या वर्गात साडेदहाच्या सुमारास अचानक रानडुकराने प्रवेश करून एकच हैदोस मांडला होता. यामुळे विद्यार्थी भयभीत झाले होते. शिक्षकांच्या समयसूचकतेमुळे सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर वर्ग खोली बंद करून कुलूप लावून त्याला कोंडून ठेवले.


यानंतर शाळा प्रशासनाकडून वनविभाग बोलवण्यात आले होते. वनविभागाच्या ४ तासांच्या प्रयत्नानंतर रानडुकराला जेरबंद करण्यात यश आले. यावेळी स्थानिकांनी शालेय परिसरात गर्दी केली होती. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आले होते. सातपुडा पर्वतरांगांमधून वाहणारा खारसा नाल्यातून अनेक जंगली श्वापदे नेहमीच गावाकडे येत असतात. आज अचानक आलेल्या या रानडुकराने ग्रामस्थांमध्ये भीती वातावरण पसरले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES