• A
  • A
  • A
रमेश हागे खून प्रकरण : पत्नीने हत्या केल्याचे तपासात उघड

अकोला - तेलारा शहरातील संभाजी चौकाजवळ राहणाऱ्या रमेश हागे याच्या खून प्रकरणात पोलिसांनी त्याच्या पत्नीला अटक केली आहे. रमेश हागे याचा अर्धवट स्थितीत जळालेल्या अवस्थेत घराबाहेर मृतदेह १० मार्च रोजी सकाळी मिळाला होता.


तेल्हारा पोलिसांनी त्याच्या मृत्यूबद्दल गुन्हा दाखल केला होता. मृताची पत्नी व मुलाच्या जबानीवरून त्यांचा कुणावरही संशय नव्हता. त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा चक्रावून गेली होती. परंतु, पोलिसांचा संशय कायम होता. मृताजवळ घटनास्थळी चिठ्ठी सुद्धा मिळाली. या चिठ्ठीमध्ये मी कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे आढळून आले. तरीही पोलिसांना हा कट असल्याची शक्यता होती.

घटनास्थळी मिळालेल्या संशयास्पद वस्तू व मृताच्या शरीरावर असलेले घाव या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. त्या तपासामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार विकास देवरे, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गवारगुरु व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या घटनेचा छडा लावला.

मृताच्या पत्नीच्या जबानीवरून व घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू तसेच झालेला घटनाक्रम बघता बरीच तफावत पोलिसांना आढळली. त्यामुळे पोलिसांनी सर्वप्रथम मृताच्या पत्नीवर संशय घेत तिची दिवसभर कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान मंगला हागे हिने पती शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी पत्नी मंगला हागे हिच्या विरोधात खुनाचा व पुरावा नष्ट करण्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला असून तिला अटक केली आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES