• A
  • A
  • A
काँग्रेससोबत आघाडी नाहीच; प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात घोषणा

अकोला - काँग्रेससोबत जाण्याचे सर्व पर्याय संपले असून आता त्यांच्यासोबत आघाडी करणार नसल्याची घोषणा भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केली. वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व जागा लढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.


हेही वाचा - सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार? प्रकाश आंबेडकर यांचे सुचक वक्तव्य


लोकशाहीचे सामाजीकरन झाले पाहिजे. समाजातील विविध घटकांना उमेदवारी मिळावी, अशी आमची भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीने २२ जागा जाहीर केल्या असून काँग्रेसने त्यांचे एबी फॉर्म या २२ उमेदवारांना द्यावे, असे ते यावेळी म्हणाले. काँग्रेस सोबत काल बोलणी झाली. मात्र, उमेदवार स्वीकारण्याची त्यांची तयारी दिसत नाही, आमच्या पठडीतले ते उमेदवार नाहीत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस सोबतची चर्चा आता पुढे जाईल असे दिसत नाही. दोन दिवसात वंचित आघाडीच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून १५ मार्चला ४८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ठ केले. दरम्यान, ते स्वतः कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार, याबाबत त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.

राज्यात सत्तापरिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न केले. मात्र, काँग्रेस प्रणित महाआघाडीत सामिल न होता. आंबेडकर यांनी भाजपविरोधात वंचित बहुजन आघाडी स्थापन करून आपली वेगळी चूल मांडली. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेतल्या आहेत. त्यांनी काँग्रेसकडे २२ जागांची मागणी केली होती. मात्र, प्रस्तावावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याने अखेर आज त्यांनी चर्चा करणार नसल्याचे सांगितले. सध्या आघाडी होण्याचे दरवाजे बंद नाहीत, असे सांगून काहीही होऊ शकते, असे संकेत आंबेडकर यांनी दिले आहेत.





CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES