• A
  • A
  • A
सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार? प्रकाश आंबेडकर यांचे सुचक वक्तव्य

अकोला - भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार याबाबत अनेक आडाखे बांधले जात असताना अखेर त्यांनी आज याबाबत सुचक वक्तव्य केले आहे. ते अकोला येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा मंगळवारी मुंबईत करणार असल्याचे स्पष्ट केले. आंबेडकरांनी सोलापूरमधून लढण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसच्या अडचणींमध्ये मात्र वाढ होणार असल्याचे दिसत आहे.

प्रकाश आंबेडकर


वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांची इच्छा आहे, की मी सोलापूर येथून लढावे. यासंदर्भात मी उद्या मुंबई येथे भूमिका जाहीर करणार आहे, असे मत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. काही दिवसांपासून काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आघाडीसंदर्भात बैठकी सुरू आहेत. मात्र, आपल्या मागण्या मान्य न झाल्याने आंबेडकर यांनी आत्तापर्यंत बहुजन आघाडीच्या २२ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. युतीबाबत झालेल्या शेवटच्या बैठकीत बहुजन आघाडीच्या वतीने लक्ष्मण माने यांनी आपले २२ उमेदवार मागे घेण्यास नकार देत अधिक जागांची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांना एवढ्या जागा देण्यास तयार नाही.

संबंधित बैठकीत लक्ष्मण माने म्हणाले होते, की मसुदा काय असावा यावर चर्चा झाली आहे. मात्र अंतिम निर्णय व्हायचा आहे. राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होईल. आम्ही २२ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत, त्या २२ जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशी आमची भूमिका आहे. मात्र कमी अधिक जागांबाबत बोलणी होऊ शकते. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी युती यांची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांच्या मंगळवारी होणाऱ्या घोषणेने युतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची ओळख काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून असल्याने आता शिंदेंच्या अडचणीतही वाढ होणार आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा मानहानीकारक पराभव केला होता. आता आंबेडकरांचेही आव्हान उभे राहिल्यास काँग्रेससाठी हा सामना अधिक कठीण होईल. दरम्यान, सोलापूरमधील आंबेडकरांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आंबेडकर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात मते मिळवू शकतील असाही अंदाज वर्तवला जात आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES