• A
  • A
  • A
तेल्हारा शहरात एकाची जाळून हत्या; घराजवळच आढळला मृतदेह

अकोला - तेल्हारा शहरातील ५० वर्षीय व्यक्तीला आज सकाळी जाळून घरासमोर फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रमेश ओंकार हागे, असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमागील कारण कळू शकले नाही.

तेल्हारा शहरात एकाची जाळून हत्या; घराजवळच आढळला मृतदेह


तेल्हाराच्या संभाजी चौकात राहणारे रमेश ओंकार हागे हे रविवारी मजुरीकरीता शेतामध्ये गेले होते. मात्र, रात्रीपर्यंत ते घरी आले नसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर आज पहाटे रमेश हागे यांचा जळालेल्या अवस्थेतेतील मृतदेह त्यांच्या घराजवळच आढळून आला. अत्यंत क्रूरपणे हागे यांची हत्या करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनेचा पंचनामा करून पुढील तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या हत्येमागील नेमके कारण अस्पष्ट आहे. ही घटना बिहार राज्यासारखीच असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. रमेश हागे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. रमेश हागे यांच्याकडे दोन एकर शेती असून त्या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES