• A
  • A
  • A
अबब! अकोल्यात चक्क मिसाईलच्या आकाराचे झाड, ठरतेय आकर्षणाचे केंद्रबिंदू

अकोला - गोरक्षण रोडवरील मिसाईल पाहून तुम्ही अचंबित व्हाल. खरोखरचे मिसाईल रस्त्यावर कसे, असा प्रश्न तुमच्या मनाला पडेल. मात्र, हे खरोखरचे मिसाईल नाही तर सुकलेल्या नारळाच्या झाडाला मिसाईलचा आकार देऊन झाडाचे केलेले सौंदर्यीकरण आहे.


ही किमया केली आहे, अकोल्यातील दोन पर्यावरण प्रेमींनी. त्यांच्या या उपक्रमाची अकोलेकरांकडून स्तुती केला जात असून अकोलेकरांसाठी निर्जीव झाडांनाही पुनरुज्जीवित करण्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

रस्त्याच्या बाजूला असलेली सुकलेली झाडे किंवा निर्जीव झालेली झाडे आपण नेहमीच पाहतो. तसेच ही झाडे कापून विकणे किंवा त्यांचा इंधनासाठी वापर करणे, अशा प्रकारचेही विचार आपण करतोच. परंतु, अशा झाडांना पुनरुज्जीवित करून आणि त्यांच्यात सौंदर्य निर्माण करून तेही झाड उपयोगात येऊ शकते, असा संदेश अकोल्यातील पर्यावरण प्रेमी शंकर कोकाटे आणि अजय गावंडे यांनी दिला आहे.
गोरक्षण रोड वरील इन्कम टॅक्स चौकामध्ये असलेल्या रस्त्याच्या बाजूला एक सुकलेले नारळाचे झाड आहे. पर्यावरण प्रेमींनी या झाडाला पांढरा चमचमीत रंग देऊन मिसाईल सारखे सजवले आहे. या झाडाच्या मध्यावर मिसाईलच्या शेवटी असलेल्या आकाराचे दोन लोखंडी पाते लावले. तसेच या झाडाच्या वरच्या बुंध्यावर गोल आणि नोकदार, असे लोखंडी टोक तयार करून बसविण्यात आले आहे.

या टोकाला काळा रंग देऊन हे झाड जणू मिसाईल सारखेच तयार केले. या झाडाला मिसाईलचे रूप देण्यासाठी त्यामध्ये आणखीन इंडिया एका बाजूला आणि त्याच्या पाठीमागे अग्नी, असे नाव लिहून त्यावर भारत देशाच्या राष्ट्रध्वजाचे तीन रंग काढून, हे झाड मिसाईलसारखेच तयार केले. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना रस्त्याच्या बाजूला मिसाइल उभे कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक वाहन चालक हे मिसाइल खरे आहे की खोटे हे पाहण्यासाठी थांबत आहेत.
या दोन्ही पर्यावरणप्रेमींच्या या नक्षीदार कृतीने सुकलेल्या व निर्जीव झाडांनाही आकार देता येतो, असा संदेश अकोलेकरांसाठी दिला आहे. तुटलेल्या झाडालाही मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न कौतुकाची बाब ठरत आहे.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES