• A
  • A
  • A
अकोल्यात बस लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ जणांना अटक

अकोला - उमरेड ते अकोला बसवर बाभूळगावजवळ दगडफेक करून ती लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा - आरटीओ कार्यालयासाठी भाडेतत्वावर जागा; इमारत जुनी असल्याने नवीन जागेचा शोध सुरू
उमरेड आगाराची (क्रमांक एमएच ४० वाय ५५४१) बस उमरेड ते अकोला या मार्गावरून जात होती. यात देवानंद गणेश गजभिये हे चालक होते. ही बस बाबूळगाव जवळ रात्री १ वाजता आली असता या बसवर काहीजणांनी दगडफेक करून ती लुटण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर चालक देवानंद गजभिये यांनी रात्री एमआयडीसी पोलीस स्थानकाला तक्रार दिली. यासंदर्भात पोलिसांनी गोपाळ गजानन काठोळे, शुभम पंजाबराव साबळे, अतुल रमेश गावंडे, रवी बाबुराव कळम, विनोद प्रकाश धनगर, अनिल बळीराम भाकरे यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्थानकात दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा - स्टार्टअपमुळे नव्या व्यावसायिकांना मिळणार बाजारपेठ - डॉ.रणजीत पाटील
या आरोपींनी बसवर दगड फेकून बसच्या काचा फोडल्या. तसेच शासकीय कामात नुकसान केल्यावरून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना एमआयडीसी पोलीस रविवारी न्यायालयात हजर करणार आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES