• A
  • A
  • A
अकोला जिल्ह्यातील शहापूर परिसरात आढळला पट्टेदार वाघाचा मृतदेह

अकोला - अकोट तालुक्यातील शहापूर परिसरात आज दुपारच्या सुमारास एका पट्टेदार वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.


शहापूर परिसरातील ई-क्लास जमिनीवर मृत व कुजलेल्या अवस्थेत पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाघाचा मुत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी अकोट तालुक्यातील चोरवड या गावातील केळी उत्पादक शेतकरी गजानन पराये यांच्या शेतात दोन पट्टेदार वाघ आढळून आले होते. त्यानंतर आज एका वाघाचा मृतदेह मृत आढळून आला. हा वाघ त्या दोन वाघांपैकीच असावा असा अंदाजही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES