• A
  • A
  • A
सहयोगी प्राध्यापकावर कारवाई करा अन्यथा आंदोलन; विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांच्या इशारा

अकोला - सहयोगी प्राध्यापक यांच्या अतिरिक्त वेतनाच्या वसुलीच्या संदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या शुक्रवारी घटनेचे पडसाद आज उमटले. कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांची भेट घेतली व संबंधित सहयोगी प्राध्यापक यांच्यावर कारवाई न झाल्यास बुधवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. तर सहयोगी प्राध्यापक यांनीही कुलगुरू यांच्याशी चर्चा केली.


शासनाच्या निर्देशानुसार कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त वेतनाची वसुली करणे आहे. तसेच शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे सहयोगी प्राध्यापकांकडून ही वसुली करण्यास सुरुवात करण्यात आली असता लाभार्थ्यांमधील काही प्राध्यापकांनी वसुलीस विरोध करीत शुक्रवारी विद्यापीठाच्या कार्यालयात धुडगूस घातला. यावेळी पीओपीच्या कक्षातील टेबलची तोडफोड करण्यात येऊन त्यांना तब्बल ५ तास डांबून ठेवले. दरम्यान, नियंत्रकांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर हे वातावरण निवळले.

शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार सहयोगी प्राध्यापक यांना वेतनापोटी अतिप्रदान झालेली रक्कम वसूल करण्याचे निर्देश आहेत. दरम्यान, राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सुमारे हजार ते बाराशे सहयोगी प्राध्यापकांनी आगाऊ रक्कम उचललेली आहे. हा अतिरिक्त प्रधान केलेल्या रकमेचा आकडा अडीचशे ते 260 कोटींच्या घरात जातो. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील दीडशे प्राध्यापकांचा समावेश असून ही रक्कम ५० कोटीच्या आसपास आहे.

दरम्यान रक्कम वसुली करिता नियंत्रकांनी शासनाची वारंवार पत्रव्यवहार केला. शासनाने त्यांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत असल्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार नियंत्रक विद्या पवार यांनी सर्व विभागांच्या डीडीओची बैठक घेऊन रक्कम वसुलीचे निर्देश दिले. गेल्या आठवड्यात बोलाविण्यात आलेल्या बैठकीमध्ये कोणीही डीडीओ उपस्थित राहिले नसल्याची माहिती आहे. या वसुलीविरोधात सहयोगी प्राध्यापकांनी नियंत्रक कार्यालयात शुक्रवारी हल्लाबोल करून नियंत्रकांवर दबाव आणला.

एकीकडे नियंत्रक शासनाच्या निर्देशानुसार रक्कम वसुली सक्ती करीत आहेत. तर दुसरीकडे सहयोगी प्राध्यापक त्याला विरोध करीत कार्यालयाची तोडफोड करीत आहेत. सहयोगी प्राध्यापकांनी नियंत्रण कक्षात केलेल्या प्रकारामुळे त्या कक्षातील कर्मचारी जितेंद्र गावंडे यांची प्रकृती खराब झाली. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत दोषींवर कारवाई न केल्यास बुधवारी काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे संतोष राऊत यांनी दिला.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES