• A
  • A
  • A
खदानीत उडी घेतलेल्या तरूणाच्या मृतदेहाचा दुसऱ्या दिवशीही शोध सुरू

अकोला - सिंधी कॅम्प येथील हार्डवेअर व्यावसायिक आदर्श कॉलनीजवळील भरलेल्या खदानीत उडी घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाकडून या युवकाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. आजचा दुसरा दिवस असून या खदानीत मृतदेह मिळून आला नाही. मोहन जसुजा, असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.


हेही वाचा - पंतप्रधान मोदी यांनी एअरस्ट्राईकचे राजकारण करू नये - अबू आझमी
मोहन जसुजा हे शुक्रवारी दुपारी त्यांची दुचाकी (एमएच ३० एक्स ७२१८) ने खदानीजवळ आले. त्यांनी दुचाकी उभी करून व बाजूला चप्पल काढून खदानीच्या पाण्यात उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी त्यांना उडी घेताना पाहिले, त्यांनी पोलिसांना तत्काळ फोन करून या घटनेची माहिती दिली. मोहन जसुजा यांचा मृतदेह काढण्यासाठी पिजर येथील सत गाडगे बाबा आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळपासून हे पथक मोहन जसुजा यांच्या मृतदेहाचा खदानीत शोध घेत आहेत. या पथकाचा आजचा दुसरा दिवस होता. सायंकाळपर्यंत त्यांचा मृतदेह मिळून आला नाही. विशेष म्हणजे, मोहन जसुजा यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पथकांनी सकाळी ६ पासून खदानीत शोध घेत आहेत. दरम्यान, पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांचे सहकारी खदानीच्या खोल पाण्यात नावेद्वारे शोध घेत आहेत. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. तसेच खदान पोलिसांचे एक पथक या ठिकाणी तैनात असून, खदानीजवळ नातेवाईकांनी एकच गर्दी केली आहे.
हेही वाचा - छुप्या पद्धतीने सहयोगी प्राध्यापकांचे पुनर्वेतन निश्चिती करण्याचा प्रयत्न

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES