• A
  • A
  • A
भारतीय वायुसेनेच्या कारवाईनंतर भीम युवक संघटनेचा डीजेच्या तालावर नाचत जल्लोष

अकोला - पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवादी तळांवर भारतीय वायुसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर जिल्ह्यातील भीमशक्ती युवक संघटनेने डीजेच्या तालावर नाचत जल्लोष केला. यावेळी देशभक्तीपर गीते वाजवून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निरुपा चौकात आज सायंकाळी आनंद साजरा केला.


वायुसेनेने दहशतवादी तळावर हल्ला करून पाकिस्तानला धडा शिकवल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या हल्ल्यात शेकडो दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्याने पुलवामा येथील भारतीय सैनिकांच्या हत्येचा बदला घेतल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, देशभरात विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष यांच्यातर्फे या हल्‍ल्‍याचा आनंद साजरा केला.

शिवसेना, काँग्रेस या पक्षांनी आतिषबाजी करत पाकिस्तान विरोधात नारेबाजी केली. भीमशक्ती युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट डीजेवर देशभक्तीपर गीत वाजवून नृत्य केले. यावेळी राष्ट्रध्वज हातात घेऊन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी नेहरू पार्क चौकामध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही कोंडी दूर करत जल्लोष करणाऱ्यांचे अप्रत्यक्षरित्या समर्थनच केले. या आनंदामध्ये भीमशक्ती युवक संघटनेचे जीवन डिगे, जगदीश भोगल, सोनू खडसे, संदीप तायडे, सोनू वरुडकर, विजय तायडे, विजय पिंपळकर, अजय सुरडकर, सुबोध गवई यांच्यासह आदी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES