• A
  • A
  • A
तेल्हाऱ्यात वर्गातच विष पिऊन शिक्षकाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

अकोला - तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथील शिक्षकाने शाळेतच विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन नारायण इंगळे असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.हेही वाचा - मुंबई विद्यापीठाचा प्रताप; परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना दाखवले गैरहजर

तळेगाव बाजार येथील राजीव गांधी विद्यालयात कार्यरत शिक्षक गजानन नारायण इंगळे (वय 45) यांनी आज दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास शाळेतील एका खोलीमध्ये विष पिऊन आत्महत्या केली. इंगळे यांनी विष घेतले असल्याची बाब येथील शिक्षकांच्या लक्षात येताच तातडीने इंगळे यांना उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
समाज घडविण्यात मोलाची भूमिका असलेल्या शिक्षकावर आत्महत्येची वेळ का आली? त्यांनी ही टोकाची भूमिका का घेतली? यासारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा पोलीस तपासानंतर होणार आहे. मात्र, सध्या याबाबत सगळीकडेच चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करणार आहेत.


हेही वाचा - भावाने लाथ घातल्याने दुसरे घर शोधण्याची पाळी; काकडेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES