• A
  • A
  • A
पोलीस भरतीची नवीन नियमावली रद्द करा; भारिपसह वंचित बहुजन आघाडीची मागणी

अकोला - पोलीस भरतीबाबत शासनाने नवीन निर्णय जारी केला आहे. मात्र, त्यांचा हा निर्णय भरतीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी जाचक असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तसेच हा जाचक निर्णय रद्द करावा या मागणीसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.



हेही वाचा - 'डिस्ट्रिक बिझनेस प्लॅन' स्पर्धा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवू - डॉ. रणजीत पाटील
शासनाने आगामी पोलीस भरतीच्या नियमावलीमध्ये बदल केले आहेत. त्या नियमानूसार मैदानी चाचणीपूर्वी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे गुणही कमी करण्यात आले आहेत. मागील ५ वर्षांत रिक्त पदांव्यतिरिक्त एकाही नवीन पदाची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात तसेच शहरी भागातही सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे.


हेही वाचा - अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य, आरोपीला १० वर्षांची शिक्षा
प्रस्तावित पोलीस भरतीच्या दृष्टीने सर्व तरुण मागील ५ वर्षांपासून जुन्या प्रक्रियेनुसार पोलीस भरतीची तयारी करत आहेत. मात्र, शासनाने नवीन नियमांचा अचानक अवलंब केला. त्यामुळे अनेक तरुणांना एक प्रकारे वंचित ठेवण्याचे कारस्थानच सरकार रचत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे पोलीस भरतीचा नवीन निर्णय शासनाने रद्द करून जुन्या पद्धतीनेच पोलीस भरती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास भारिप बहुजन महासंघ तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES