• A
  • A
  • A
'डिस्ट्रिक बिझनेस प्लॅन' स्पर्धा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवू - डॉ. रणजीत पाटील

अकोला - केंद्र सरकारच्या सहकार्याने व राज्य शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या 'डिस्ट्रिक बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन' आणि 'हिरकणी महाराष्ट्राची' योजनांचे नियोजन करणार आहेत. तसेच या योजना जिल्ह्यात पूर्णपणे राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


या दोन्ही योजनांचे अनावरण आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग व नागरिक उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. या संदर्भात केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेची माहिती घेतली.

हेही वाचा- अकोल्यात थ्रेशरमध्ये अडकून शेतमजुराचा मृत्यू
योजनेद्वारे आरोग्य तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत उत्कृष्ट कल्पना मांडणाऱया ५ व्यक्तींची निवड जिल्हास्तरावरून करण्यात येईल. या ५ व्यक्तींना ५ लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येतील. संबंधित प्रस्तावांची निवड समितीद्वारे करण्‍यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर १८ व १९ फेब्रुवारीला अकोला येथे मेळावा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांना नियुक्त करण्यात आले आहे. यासंदर्भातील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत. तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात इच्छुकांना अर्ज भरता येणार आहेत.
हेही वाचा- राज्य महामार्ग दुरुस्तीत हलगर्जीपणा, काम निकृष्ट होत असल्याचा नागरिकांचा आरोप
'हिरकणी महाराष्ट्राची' योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना, नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगाचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. तसेच या योजनेमध्ये तालुकास्तरावर सेवा, वस्तू उत्पादन करणाऱ्या महिला बचत गटातून प्रत्येक तालुक्यात १० बचत गटांची निवड करण्यात येईल. त्यांना ५० हजारांचा निधी देण्यात येईल. जिल्हास्तरावरून ५ बचत गटांची निवड करण्यात येईल. त्यांना उद्योग उभारणीसाठी २ लाखांचा निधी देण्यात येणार असल्याचीही माहिती पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.