• A
  • A
  • A
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला १५१ कोटी देणार - अर्थमंत्री मुनगंटीवार

अकोला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे ५० वे वर्ष असून या विद्यापीठाच्या विकासासाठी खासदार संजय धोत्रे व आमदार सावरकर यांनी मागितलेल्या शंभर कोटी निधी ऐवजी १५१ कोटी रुपये देऊ, अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्याचबरोबर या निधीतील ५० टक्के रक्कम हे संशोधन व रिसर्च कार्यासाठी खर्च करा, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी आज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांना आपल्या भाषणातून दिला.


हेही वाचा - पुढच्या अर्थसंकल्पात शेतकरी केंद्रबिंदू राहील - अर्थमंत्री मुनगंटीवार
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभाला विद्यापीठांचे प्रतिकूलपती तथा कृषी व फलोत्पादन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंचावर शास्त्रज्ञ, माजी कुलगुरू व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी चार वर्षात ५,८४० दिवस शिक्षण घेतले. बारा बाय नऊ इंचाचा कागद मिळवण्यासाठी ८४ लाख ९,६०० मिनिटे खर्च केली. बारा बाय नऊ इंचाचा कागदावर देशाचे मानचिन्ह व शेतकऱ्यांसाठी तंत्र उपलब्ध करून देण्याची ताकद तुम्हाला मिळाली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा उंचाविण्याची तंत्र तुम्ही निर्माण करावे, असा सल्ला दीला. 'मेरे देश की धरती' हे गाणं म्हणत शेतकरी तंत्रज्ञान पूरक करण्याचा संकल्प तुम्ही या दीक्षांत समारंभातून बाहेर पडताना करा, असा उपदेश अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
हेही वाचा - ,...अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय फोडू - आमदार देशपांडे
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES