• A
  • A
  • A
पुढच्या अर्थसंकल्पात शेतकरी केंद्रबिंदू राहील - अर्थमंत्री मुनगंटीवार

अकोला - केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ६ हजार रुपये वार्षिक मदत देण्याची घोषणा केली आहे. राज्यही भविष्यात मागे राहणार नाही. 'जय किसान' म्हणत शेतकऱ्यांचा सन्मान वाढवीत 'अन्नदाता सुखी भव' या संकल्पनेने पुढच्या अर्थसंकल्पात शेतकरी केंद्रबिंदू राहणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.


हेही वाचा - आता शिवसेनेच्या पडद्यामागे प्रशांत किशोर? उद्धव ठाकरेंची घेतली भेट, चर्चेला उधाण
केंद्राने नुकतेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मदत जाहीर करू, असे सांगितले. त्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी आपल्या ब्लॉगवर राज्य सरकारांनाही शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात सल्ला किंवा सूचना दिल्या होत्या. यासंदर्भात आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतील सर्वाधिक निधी शेतकऱ्यांसाठी उभा केला. राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे, असे त्यांनी सांगून ते पुढे म्हणाले, हे रयतेचे राज्य आहे. शिवाजी महाराजांचा विचार घेऊन हे सरकार चालत आहे. यावेळी खासदार संजय धोत्रे व आमदार रणधीर सावरकर उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES