• A
  • A
  • A
...अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय फोडू - आमदार देशपांडे

अकोला - शिक्षकांच्या समस्या जिल्हा परिषद प्रशासनाने १० फेब्रुवारीपर्यंत सोडवाव्यात. अन्यथा ११ फेब्रुवारीला सीईओंच्या कक्षात जावून तोडफोड करून सीईओंची खुर्ची पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा आमदार देशपांडेंनी जिल्हा परिषदेत सोमवारी ठिय्या आंदोलनादरम्यान दिला. यावेळी उपस्थित अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी प्रशासनाची बाजू मांडली व शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

शिक्षकांनी जि. प. कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.


जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संध्याकाळी ५.५५ वाजता जिल्हा परिषदेत धाव घेतली. आमदारांच्या पोहोचण्यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कैलास पगारे यांच्या कक्षाकडे जाणाऱ्या गेटला पोलिसांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी कुलूप लावले. त्यामुळे आमदार व शिक्षकांनी सीईओंच्या कक्षाखाली ठिय्या आंदोलन केले. परंतु, काही वेळानंतर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे जिल्हा परिषदेत आले.
हेही वाचा - वन्यप्राण्यांसाठी विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांच्या वेशात पालकमंत्र्यांना दिले निवेदन
यावेळी दहा फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदार देशपांडे व शिक्षकांना दिले. मात्र, त्यानंतर सुद्धा संबंधित समस्या न सुटल्यास ११ फेब्रुवारीला सीईओंच्या कक्षात जाऊन तोडफोड करू व सीईओंची खुर्ची प्रशासनाच्या ताब्यात देऊ, अशा इशारा आमदार देशपांडे यांनी यावेळी दिला.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES