• A
  • A
  • A
पर्यावरण जनजागृतीसाठी शहरात हाफ मॅरेथॉनचे २४ फेब्रुवारीला आयोजन

अकोला - पर्यावरण जनजागृतीसाठी अभियान निर्माण व्हावे, यासाठी शहरात हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा स्टुडिओ थर्टी व गो ग्रीन फाऊंडेशनच्यानवतीने घेण्यात येत असल्याची माहिती श्रद्धा अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.


हेही वाचा - COPA DEL REY: एल क्लासिकोला लिओनल मेस्सी मुकण्याची शक्यता
अग्रवाल यांनी सांगितले, स्पर्धा २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात घेण्यात येणार आहे. ५, १० आणि २१ किलोमीटर अशा अंतराच्या ३ प्रकारच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेत महिला आणि पुरुषांसाठी एकूण अडीच लाखांची वेगवेगळी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा - आयसीसीवर भडकला शेन वॉर्न, म्हणाला कॉमनसेन्स कुठे गेला?
स्पर्धेद्वारा संकलित होणारा निधी महानगरातील वृक्षारोपण मोहिमेसाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. या अभिनव मॅरेथॉन स्पर्धेत वृक्ष संवर्धनाची आवड असणाऱ्या नागरिक व महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन धनंजय भगत यांनी केले आहे. ही स्पर्धा कृषी विद्यापीठाच्या आवारात होत असल्याने विद्यापीठातील वातावरण स्पर्धकांसाठी योग्य असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - वनडे क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी, विराट-जसप्रीत 'टॉपर'
यावेळी पत्रकार परिषदेला प्रकाश सावल, सुभाष चांडक, सोनाली अग्रवाल, उदय अग्रवाल, सुमित्रा खेतान, महेंद्र केतन, राजेश पूर्वी, कनुभाई सायानी, कुशल खंडेलवाल, दीपक अग्रवाल, संध्या अग्रवाल, दीप्ती सिकरिया इत्यादी उपस्थित होते.
हेही वाचा - बॅडमिंटनच्या सुपरस्टार्सनी गाजवला लॅकमे फॅशन वीक, सिंधूचा 'हॉट' अवतार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES