• A
  • A
  • A
वन्यप्राण्यांसाठी विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांच्या वेशात पालकमंत्र्यांना दिले निवेदन

अकोला - वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केल्यास ते नागरी वस्तीत येणार नाही, या उद्देशाने आज विद्यार्थ्यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात विद्यार्थ्यांनी वन्यप्राण्यांची वेशभूषा करून हे निवेदन दिले.


दुष्काळ आणि मानवी हस्तक्षेपामुळे जंगलात राहणे अवघड झाल्यामुळे विद्यार्थांनी वन्यप्राण्यांच्या वेशात पालकमंत्र्यांना निवेदन दिले. दुष्काळात मानवासाठी सरकारने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, वन्यप्राण्यांसाठी कोणतीही उपयोजना नसते. परिणामी वन्यप्राणी नागरीवस्तीकडे येऊ लागतात आणि मानव वन्यजीव संघर्ष सुरू होतो.
हेही वाचा - अण्णा हजारेंच्या उपोषणाबाबत सरकार गंभीर नाही, युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
वन्यप्राण्यांना कृत्रिम पांवठ्याद्वारे पिण्यासाठी पाण्याची सोय करावी, मानवी अतिक्रमणापासून रक्षण करावे, अन्न पाण्यासाठी स्थलांतर करताना महामार्गावर होणारे वन्यप्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी उपयोजना कराव्यात या मागण्यांचे निवेदन जान्हवी राठी, महेक अग्रवाल, कृष्णा अटल, चिराग राठी, अथर्व लोखंडे यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांना दिले.
हेही वाचा- माझ्या वडिलांचे काही झाले असेल तर त्याचा जीव घेईन - पंकजा मुंडे

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.