• A
  • A
  • A
अकोल्यात अंतर्गत वादातून एकावर प्राणघातक हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

अकोला - शहरातील सातव चौकात अंतर्गत वादातून तिघा जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री घडली. भुऱ्या उर्फ विरेंद्रसिंग रोहेल, असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा - सरकारने बजेटचे भले मोठं गाजर दिलं, अजित पवारांचा सरकारवर हल्ला

रविवारी रात्री विरेंद्रसिंग रोहेल याचा हेमंत मिश्रा, अनुप मिश्रा आणि नितीन संकत यांच्याशी वाद झाला. या तिघांनी लोखंडी पाइप आणि तीक्ष्ण दगडाने वार करत विरेंद्रसिंगला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाश मडलेकर याच्या फिर्यादवरून पोलिसांनी हेमंत, अनुप आणि नितीन संकत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा - भीमाशंकरजवळ मंदोशी घाटात पीकअप गाडीचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

काय होता वाद

सन २०१५ मध्ये हेमंत मिश्रा, अनुप मिश्रा, आकाश मंडलेकर, विरेंद्रसिंग रोहेल यांनी पप्पू मिश्रा यांना संपत्तीच्या वादावरून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी हे सर्व आरोपी होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बचावासाठी विरेंद्रसिंग रोहेल याने एक वकील नेमला आहे. आमच्यासाठी पण वकील करून दे, यावरून हेमंत, अनुप, नितीन यांच्यात वाद सुरू होता. रविवारी याच अंतर्गत वादातून त्यांनी विरेंद्रसिंगवर हल्ला केला होता.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES