• A
  • A
  • A
चोरवडमध्ये २ पट्टेदार वाघांची भ्रमंती, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अकोला - अकोट तालुक्यातील चोरवड या गावातील केळी उत्पादक शेतकरी गजानन पराये यांच्या शेतात शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन पट्टेदार वाघ दिसून आले. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान वनविभागाचे अधिकारी व ग्रामस्थांना वाघांच्या पायांचे ठसे शेतात दिसून आले.हेही वाचा - चंद्रपुरमध्ये वन्यजीव आणि माणसांमधला संघर्ष शिगेला, तोडग्यासाठी...
गजानन पराये हे शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले असता काम करताना त्यांना आपल्या शेतात दोन पट्टेदार वाघ फिरताना दिसले. तसेच हे दोन्ही वाघ थोड्यावेळाने त्यांच्या शेतात एका ठिकाणी आराम करत असल्याचेही त्यांना दिसून आले. त्यांनी यासंदर्भात ग्रामस्थ व वनविभागाला माहिती दिली. यानंतर वनविभागाने तत्काळ त्यांच्या शेतात भेट देऊन वाघांचा शोध घेतला. शेतातील पाऊलखुणाही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहिल्या.


वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतात ठाण मांडून बसले असून शुक्रवारी रात्रीही दोन्ही वाघ त्यांच्या शेतात विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून आल्याची माहिती आहे. मात्र, या वाघांना जेरबंद करण्यात अद्याप वनविभागाला यश आलेले नाही. या वाघांच्या भ्रमंतीमुळे येथील शेतकरी व शेतमजूरांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.


हेही वाचा - चंद्रपुरातील एकारा-मेंडकी गावात एकाच वेळी चार वाघ रस्त्यावर,...
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES