• A
  • A
  • A
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ७५ वर्षीय आरोपीला जन्मठेप

अकोला - पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ७५ वर्षीय वृद्ध आरोपीस जिल्हा व सत्र प्रथम श्रेणी न्यायाधीश एम. आय. आयरलैंड यांनी आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अब्दुल अजिज अब्दुल मिया दालमिया देशमुख असे आरोपीचे नाव आहे.


बोरगाव मंजू पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या अन्वी मिर्जापूर येथील ७५ वर्षीय अब्दुल अजिज अब्दुल मिया डालमिया देशमुख याने घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगितला. आईला शंका आल्याने तिने मुलीची चौकशी केली. तसेच अब्दुल अजीज यास जाब विचारला. परंतु, अजीज याने त्या मुलीच्या आईला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने याबाबत बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यामध्ये कलम ३७६ पोस्को कलम ५, ६ नुसार गुन्हा दाखल केला. बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक वाय. पी. उईके यांनी तपास पूर्ण करून प्रकरण न्यायालयात दाखल केले.
हेही वाचा -कर्नाटकचा 'रमण राघव'.. सायनाईड मोहनचा ३२ महिलांवर बलात्कार-हत्या, पोलिसही...
सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. तर आरोपींकडून दोन साक्षीदार न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दोन्हीही वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र प्रथम श्रेणी न्यायाधीश एम. आय.च आयरलैंड यांच्या न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. त्यानुसार पॉस्को कलम ५, ६ मध्ये जन्मठेप व १० हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याची शिक्षा न्यायालयाने सुनावली. तसेच कलम ५०४ आणि ५०६ मध्ये प्रत्येकी दोन वर्ष शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्याची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे मंगला पांडे यांनी बाजू मांडली.
हेही वाचा -मेहुणीला फोन करून त्रास देतो म्हणून 'त्याला' केले ठार

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES