अकोला - रेल्वेच्या गेटमध्ये बसलेल्या चंद्रपूरच्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी येथील कैची पुलाजवळ घडली. सुनील वाघमारे असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा -सरकारच्या अंतरिम बजेटवर शेतकऱ्यांचा रोष, तर व्यापाऱ्यांसह शासकीय कर्मचारी खुश चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पोलीस स्थानकामध्ये कार्यरत असलेले सुनील काशिनाथ वाघमारे (२९, बक्कल नं. २४१३) हे रेल्वेने (क्र. १२६१) प्रवास करीत होते. ते रेल्वे डब्याच्या गेटमध्ये बसलेले होते. त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. त्यातच गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या अपघातावेळी पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे हे घटनास्थळी होते. मृत पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हेही वाचा -अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील मजुरांना ३ हजार पेन्शनचा निर्णय; मजुरांमध्ये आंनदाचे वातावरण