• A
  • A
  • A
अर्थसंकल्पात ६० वर्षांवरील मजुरांना ३ हजार पेन्शनचा निर्णय; मजुरांमध्ये आंनदाचे वातावरण

अकोला - हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी कामगारांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यात ६० वर्षांवरील मजुरांना ३ हजार पेन्शन घोषित करण्यात आली आहे. यावर अकोल्यातील मजुरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात.


अकोला बांधकाम मजूर जिल्हा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी या निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानले. वयाच्या ६० वर्षांनंतर मजुरांचे हाल होतात. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाने अकोल्यातील मजूर आनंदी झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा - BUDGET 2019 : अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार ६ हजारांची मदत
मजूर रवींद्र सुर्यकार म्हणाले की, सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, पेन्शन महिन्याला मिळणार की, वर्षाला याबाबत संभ्रम असल्याचे त्यांनी सांगितले. वयोवृद्ध मजूर मिया खान यांनी या निर्णयाचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हेही वाचा - BUDGET-२०१९: रेल्वेसाठी ६४ हजार ५०० कोटी, सेमी हायस्पीड 'वंदे भारत एक्स्प्रेस'ची घोषणा

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES