• A
  • A
  • A
सरकारच्या अंतरिम बजेटवर शेतकऱ्यांचा रोष, तर व्यापाऱ्यांसह शासकीय कर्मचारी खुश

मुंबई - सरकारने अंतरिम बजेट घोषीत केलेले आहे. या बजेटवर विविध क्षेत्रातून प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहे. बजेटबाबत अनेक लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी यावर रोष व्यक्त केला आहे.


काय म्हणाले शेतकरी? -
निवडणुकीच्या तोंडावर सरकारने शेतकऱ्यांना गाजर दाखवले आहे. २०१९ च्या बजेटमुळे सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. ६ हजाराचे पॅकेज देऊन सरकारने शेतकऱ्यांची चेष्ठा केली आहे. शेतकऱ्यांना या पॅकेजची गरज नाही. यापेक्षा सरकारने शेतमालाला योग्य हमीभाव दिल्यास शेतकरी सुखी राहिल, अशी प्रतिक्रिया यवतमाळ, नागपूर, अकोला आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, वसंतराव नाईक शेतकरी स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी टॅक्सबाबतच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, कोरडवाहू आणि आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांना २ हेक्टरची मर्यादा देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.