• A
  • A
  • A
डॉ. आंबेडकर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेला ६ फेब्रुवारीपासून होणार सुरुवात

अकोला - प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्थेतर्फे गेल्या ४ वर्षापासून डॉ. आंबेडकर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. ही स्पर्धा येत्या ६ फेब्रुवारी रोजी वसंत देसाई क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


हेही वाचा - दादोजी कोंडदेव स्टेडियम खेळपट्टीचे १ फेब्रुवारीला उद्घाटन, सेलिब्रिटी लीगचे...
'विदर्भ बॉडी अँड फिटनेस असोसिएशन'ची मान्यता असल्याने ही स्पर्धा आकर्षक होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी आमदार विप्लव बाजोरीया हे राहणार आहेत. आमदार गोपीकिशन बाजोरिया, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, माजी आमदार हरिदास भदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा - पत्नी अनुष्कामुळे विराट बनला 'व्हेगन', दुग्धजन्य पदार्थांचा केला त्याग
शरीरसौष्ठव स्पर्धा ६ वेगवेगळ्या गटात होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, असेही संस्थेचे अध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अमोल शिरसाट, जीवन डिगे हे उपस्थित होते.
हेही वाचा - बुकीज संदर्भात बीसीसीआयला का नाही सांगितले? न्यायालयाचा श्रीसंतला प्रश्नCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES