• A
  • A
  • A
नाशिकच्या दिंडोरीत युतीच्या पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न

नाशिक - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये दोन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.


शहरातील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण, दादा भुसे, आमदार योगेश घोलप भाजपचे आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, आदींसह शहरातील युतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत उद्या होणाऱ्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. शिवसेना-भाजप युतीनंतर या दोन्ही पक्षांमधील ही पहिलीच एकत्रित बैठक असल्याने, या बैठकीला सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.



CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES