• A
  • A
  • A
घाबरलो असतो तर घरातच बसलो असतो - छगन भुजबळ

नाशिक - आम्ही घाबरायचा संबंधच नाही. घाबरलो असतो तर घरातच बसलो असतो. जाहीर सभा घेतल्या नसत्या, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.


नाशिकमधून समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यानंतर भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, समीर भुजबळ यांना उमेदवारी द्या, ही कार्यकर्त्यांची मागणी आहे. युवकांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत. शरद पवार यांनी आजपर्यंत पराभव पहिला नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचा कालावधी अजून बाकी आहे.
हेही वाचा - दिंडोरी लोकसभा मतदार संघात राजकीय भूकंपाची शक्यता ?
वंचित आघाडीसोबत आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. आघाडी ४ जागा त्यांना द्यायला तयार होती. मात्र, आरएसएसवरील बंदी या मागणीमुळे ते फिस्कटले. एकत्रित मसूदा करायला आम्ही तयार होतो. परंतु त्यास ते तयार नाहीत. आम्ही आरएसएसच्या बाजूने नाही. ज्या जागा आघाडी लढवणार त्या जागेवर ते अडून बसले आहेत. वंचित आघाडीला, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत बोलणी करण्यात रस नव्हता, असे आमचे मत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - धनंजय मुंडेंची वीर जवान निनाद मांडवगणेंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
जनतेचा सरकारवर रोष आहे. नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफी, शेतकरीविरोधी धोरण यामुळे जनता सरकारच्या विरोधात आहे. नाशिकमध्ये गेल्या साडेचार वर्षात विकास थांबला आहे. भुजबळांना श्रेय मिळू नये, म्हणून विकासकामे केली नाही. नाशिक बेवारस झाले आहे. विचारणारे कोणी नसल्याचेही भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES