• A
  • A
  • A
स्विमिंग करून बाहेर पडताच ५९ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक - स्विमिंग केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने एका ५९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शहरातील वीर सावरकर जलतरण तलाव परिसरात आज सकाळी ही घटना घडली. हेमंत तराटे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


द्वारका परिसरातील रहिवासी असलेले हेंमत तरटे पोहण्यासाठी जलतरण तलावात गेले होते. स्विमिंग केल्यानंतर बाहेर येताच लॉकर रूम जवळ त्यांना हृदविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, धक्का एवढा तिव्र होता की उपचारापूर्वीच त्यांनी प्राण सोडले.
हेही वाचा - शरद पवारांनी वडिलांबद्दल केलेले वक्तव्य दुर्दैवी - राधाकृष्ण विखे पाटील
शरीराच्या तापमानात पाण्यात गेल्यावर बदल होतो. त्याचा परिणाम शरीरावर होऊन हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. त्यामुळे स्विमिंग केल्यानंतर बाहेर पडल्यावर अनेक वेळा हृदयविकाराचा झटका येतो. वयाच्या ४५ वर्षानंतर शरीरात अनेक बदल होत असतात. हृदयाच्या रक्तवाहिन्या अशक्त पडतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी स्विमिंगला जाण्यापूर्वी वर्षातून एकदा शारीरिक तपासणी करावी. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्विमिंग करण्याचा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. जगदाळे यांनी दिला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES