• A
  • A
  • A
दिंडोरी लोकसभा मतदार संघात राजकीय भूकंपाची शक्यता ?

नाशिक - लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेत्यांमध्ये पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही येत्या काही दिवसात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षात नाराज असलेले आणि तिकीट मिळण्याची शक्यता नसल्याने ईच्छुक उमेदवार पक्ष बदलण्याची शक्यता आहे.


मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवारांचा पराभव केला होता. या वेळेसही हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपकडून तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीकडून डॉ. भारती पवार हे पुन्हा इच्छुक असताना पक्षाने दिंडोरीचे माजी आमदार धनराज महालेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. राष्ट्रवादीकडून पवारांच्या उमेदवारीला पक्षातूनच अडसर झाल्याचे चित्र आहे. डॉ. भारती पवार या राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्या तरी महालेंच्या संभाव्य उमेदवारीने त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवण्याची तयारी चालवल्याची चर्चा मतदारसंघात असून येत्या दोन ते तीन दिवसांत डॉ. भारती पवार या भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाचा- मसूद अजहरच्या मुद्द्यावरून मोदींच्या परराष्ट्र धोरणावर काँग्रेसचा सवाल
डॉ. भारती पवार यांनी गेल्या ५ वर्षापासून मतदारसंघात सातत्याने जनसंपर्क ठेवल्याने भाजपमधील काही नेतेच त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. माकपकडुनही कळवण-सुरगाण्याचे आमदार जे.पी.गावीत यांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. जे.पी.गावीत यांनी गेल्या वर्षी आदिवासींच्या वनजमिनी नावावर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुंबई येथे मोर्चा काढला होता. याचा फायदा गावित यांना मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. डॉ. भारती पवार जो निर्णय घेतील त्यासोबत राहुन काम करण्याचा निर्धार पवारांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.

वाचा- मसूद अजहरच्या मुद्द्यावरून मोदींच्या परराष्ट्र धोरणावर काँग्रेसचा सवाल
दुसरीकडे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे पुन्हा भाजपची उमेदवारी मिळेल या विश्वासाने तयारीला लागले आहेत. मात्र डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली तर चव्हाण काय निर्णय घेतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पक्षनिष्ठेच्या बळावर चव्हाणांनाच पुन्हा उमेदवारी भेटेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. दिंडोरी राखीव मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होत आहे. भाजप, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, माकप अशा प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे स्वरूप लक्षात घेतल्यास दिंडोरी व कळवणसारखे आदिवासीबहुल तालुके, निफाडसारखा सधन परिसर आणि देवळा, चांदवड, येवला व नांदगाव या दुष्काळी तालुक्यांचा त्यात समावेश होतो. २०१४ निवडणुकीत भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा ५ लाख ४२ हजार ७८४ मतानी विजय मिळाला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार २ लाख ९५ हजार १६५ मते मिळुन पराभव झाला होता.
दरम्यान येत्या आठ दिवसांत दिंडोरी मतदारसंघातील राजकीय चित्र पालटलेले असेल अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली असून डॉ. भारती पवारांचा भाजपमधील प्रवेश निश्चित मानला जात आहे.

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे

१) आदिवासी राखीव मतदार संघ असल्याने कायम उपेक्षा
२) ६० टक्के भाग सिंचनापासून वंचित
३) भौगोलिक स्थिती भिन्न असताना मतदार संघ
४) रेल्वे मार्गाचे जाळे नाही
५) मांजरपद प्रकल्प मतदार संघासाठी वरदान परंतु मतदार संघाला त्याचा लाभ नाही
६) चांदवड येवला वगळता मोठ्या शैक्षणिक संस्था नाहीत
७) मतदार संघात एकही औद्योगिक वसाहत नाही.
८) नांदगाव तालुक्यातील जवळपास ५०- ६० हजार मजूर ६ - ८ महिने उसतोडीसाठी तालुका सोडून राज्य परराज्यात जातात
जातीपातीच समिकरण -
९)मराठा समाजाचे वर्चस्व, आदिवासी राखीव मतदार संघ.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES